'मी तुझा' नि 'माझी तू', शब्द आठवायचे
तू कुठे नि मी कुठे, नेत्र भेटलेच ना
बंध रेशमी असे, ना कधी सुटायचे
श्वास शब्द जाहले, तुझेच नाव रेखती
चुंबते मी श्वास का?, कुणा कसे कळायचे?
देह जाहला गुलाब, यौवनी टपोरता
स्पर्श दूर का तुझे, कधी गुलाबी व्हायचे?
एक फक्त जाणते, प्रीत आपुली खरी
घे मला कवेत तू, का कुणास भ्यायचे?
मीलनात धुंद धुंद, देह रिक्त होऊ दे
तृप्त तू हसायचे, तृप्त मी बघायचे
कुशीत येऊ दे तुझे, अंशरूप गोजिरे
तुझेच रूप पाहता, मी किती भिजायचे
तू जमीन, बीज मी, पुरून घे तुझ्यात तू
जन्म जन्म मी तुझी, सावली बनायचे...