Tuesday, 28 February 2012

मराठी अस्सल विनोद


नवरा :-राजा दशरथ ला ३ राण्या होत्या .
बायको :-मग ?
नवरा :-मी पण २ लग्न करू शकतो अजून ..
बायको :-विचार करा ..
द्रौपदीला ५ नवरे होते..

नवरा :- sorry..
गम्मत केली ग ...

________________________________________


लग्नापूर्वी मुलाच्या घरी साधारण मिळणा-या गोष्टी:
१) सुगंधी अत्तर,
२) प्रेम पत्र,
३) गिफ्ट्स,
४) डेबिट कार्ड्स,
५) आय फोन ( I Phone)

लग्नानंतर मुलाच्या घरी साधारण मिळणा-या गोष्टी:
१) पेन किलर्स/ झंन्डु बाम ( Pain Killers)
२) थकलेली बिले, ३) कर्जाचे पेपर्स,
४) बाजार भरायची पिशवी,
५) नोकिया – १६००

भेटशील ना?


मला तो अजिबात आवडत नाही. तो त्याचे मित्र खूप irretate  करतात मला , मला तो आवडत नाही माहित असून सुधा त्याने माझा खूप वेळा पाठलाग केला माझ्याशी येऊन बोलण्याचा प्रयत्न केला ..मी त्याला प्रत्येक वेळी उडवून लावलं तरी त्याच्यात किंचित हि फरक नाही पडला,खुपदा तो मला अचानक दिसायचा कधी भाजी मंडई मध्ये तर कधी बस stop  वर माझ मत त्याचाविषयी कधीच चांगले न्हवते ,मला तो कधीच आवडला न्हवता , आवडत नाही आणि आवडणार हि नाही ,आज माझे college संपून ६ महिने झाले होते आज मी बँकेत गेले होते entrance exam ची पैसे भरण्याची आजची शेवटची मुदत होती आणि बँक  मध्ये खूप मोठी रांग लागली होती , मी मनाशी म्हटले आज जर पैसे भरू नाही शकले तर १ वर्षे फुकट जाणार ,आणि माझ्या ३-४  लोकांच्या पुढे तो उभा होता , मी म्हटले ह्याला पण हीच वेळ मिळावी....माझा मूड खूप खराब झाला त्याला पाहून पण त्याचे माझ्याकडे लक्ष नवते आणि माझी खास मैत्रीण सुधा अजून आली नवती कुठे अडकली असेल मी विचार करीत  होते ,पूर्ण अर्ध्या तासाने माझा number  आला cashier ने पैसे मागितले मी पैसे घेण्यासाठी पर्स काढली आणि मला धक्का बसला त्यात पैसे कुठे होते मी खूप गोंधळले माझा चेहेरा लाल झाला मला रडू कोसळले कारण आता पैसे भरण्यासाठी फक्त १५ मिनिटे राहिली होती, रांगेतले लोक खूप ओरडू लागले तेव्हा cashier च्या खिडकीतून कोणीतरी हात पुढे केला हातात ७५० रुपये होते   cashier  ने पण पटकन पैसे घेत माझा फॉर्म काढून हातात दिला हे सर्व इतक्या झटपट झाले कि मी पाहण्या शिवाय काहीच करू नाही शकले ,ती व्यक्ती म्हणजे तोच होता.... मला आता समजेना काय करावे thank you  म्हणावे  कि तू माझे पैसे का भरलेस विचारावे त्याला बहुतेक समजले कि मी काय विचार करतेय त्याने सरळ बाहेरचा रस्ता धरला , क्षणात तो निघूनही गेला मी विचार करू लागले कि इतक्या वर्षात त्याने कित्येक वेळा त्याने मला विचारले मी त्याचा तिरस्कार करताना सुद्धा,भलेही त्याचे मित्र इतके चांगले नसतील पण त्याने मला कधीही फारसा त्रासही   दिला न्हवता इतक्या वर्षात मी त्याचा पहिल्यांदा विचार करीत होते ...माझी मैत्रीण हि आली इतक्यात तिला मी सर्व हकीकत सांगितली ...मक्ख मनाने मी घरी परतले , माझ्या मनाची अशी अवस्था झाली होती कि जी मलाच समजत नवती घराचा दरवाजा उघडला तर समोर टेबलावर  विसरलेले ७५० रुपये दिसले ..खूप दिवस विचार केल्यानंतर मी निर्णय घेतला कि त्याला thank you बोलायचे म्हणून ...आज या घटनेला ३ वर्षे उलटून गेली आहेत पण thank you म्हणायला तो भेटलेला नाही खूप शोधले त्याला ,आता मला माझाच राग आहे त्याचवेळी   thank you  बोलायला हवे होते मी...मनात एक प्रकारची feeling आहे जी नाही व्यक्त करू शकत
मानस ओळखायला आपण इतकी मोठी चूक कशी करू शकतो....
हि note  वाचायला मिळाली तर नक्की एकदा भेट मला   thank you  म्हणायचं तुला आणि माफ हि करायचं स्वताला..
दुसर्या विषयी न जाणता  chukiche मत बनवणे योग्य नाहीये  समजलंय मला 
काही  निर्णय वेळेनुसार बदलूही  शकतात ...

please ..

भेटशील ना? ? ?

बाप घराचं अस्तित्व असतो.


आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. पण घराच्या या अस्तित्वाला खरच कधी आम्ही समजून घेतलं आहे का? वडिलांना महत्व असूनही त्यांच्याविषयी जास्त बोललं जात नाही,लिहिलं जात नाही.कोणताही व्याख्याता आईविषयी जास्त वेळ बोलत राहतो.संत महात्म्यानीही आईचाच महत्व अधिक सांगितला आहे.काही लोकांनी बाप रेखाटला पण तोही तापट,व्यसनी,मारझोड करणारा.समाजात एक दोन टक्के बाप असे असतीलही पण चांगल्या वडिलांचे काय?
         आईकडे अश्रुंचे पाट असतात,पण बापाकडे संयमाचे घाट असतात.आई रडून मोकळी होते,पण सांत्वन वडिलांनाच करावं लागतं,आणी रडनार्यांपेक्षा सांत्वन करणारांवरच जास्त ताण पडतो.कारण ज्योतीपेक्षा समईच जास्त तापते ना! पण श्रेय नेहमीच ज्योतीला मिळत राहत! रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते,पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो नाही? आई रडते,वडिलांना रडता येत नाही.स्वतःचा बाप वारला तरीही रडता येत नाही,कारण छोट्या भावंडाना जपायचा असत.पत्नी आयुष्यात अर्ध्यावरच सोडून गेली तरी पोरांसती अश्रुना आवर घालावा लागतो.
        जिजाबाईंनी शिवाजी घडवला असा अवश्य म्हणाव,पण त्याचवेळेस शहाजीराजांची ओढताण सुद्धा लक्षात घ्यावी.देवकीचं,यशोदेचं कौतुक अवश्य करावं पण पुरातून कृष्णाला डोक्यावर घेऊन जाणारा वासुदेव लक्षात ठेवावा.राम हा कौसल्येचा पुत्र अवश्य असेल पण वियोगात तडफडून मरण पावला तो पिता दशरथ होता.वडिलांच्या टाचा झिझ्लेल्या चपलांकडे पाहिलं कि त्यांचा प्रेम कळतं.त्यांची फाटकी बनियान पहिली की कळत '' आमच्या नशिबाची भोकं त्यांच्या बनियनला पडली आहेत '' त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो.
      मुलीला गाऊन घेतील.मुलाला लुंगी घेतील पण स्वतः मात्र जुनी प्यांट वापरायला काढतील.मुलगा सलून मध्ये वीस-पंचवीस रुपये खर्च करतो पण, त्याच घरातला बाप दाढीचा साबण संपला म्हणून आंघोळीच्या साबणाने दाढी खरडत असतो.अनेकदा तो नुसते पाणी लावून दाढी करतो.बाप आजारी पडला तरी पटकिणी दवाखान्यात जात नाही. तो आजाराला मुळीच घाबरत नाही,पण डॉक्टर एखाद महिना आराम करायला लावतील याचीच त्याला भीती वाटते.कारण पोरीचा शिक्षण बाकी असत.घरात उत्पनाच दुसरं साधन नसतं.ऐपत नसते तरीही मुलांना मेडिकलला,एन्जेनीअरिन्ग्ला  प्रवेश मिळवून दिला जातो ओढताण सहन करून त्यांना दरमहिन्याला पैसे पाठवले जातात.पण सर्वच नसली तरी काही मुलं अशीही असतात की जे पैसे येताच मित्रांना पार्ट्या देतात आणी ज्या बापानी पैसे पाठवले त्याच बापाची टिंगल करतात.एकमेकांच्या बापाच्या नावानी एकमेकाला हाका मारतात.
       ज्या घरात बाप असतो त्या घराकडे कोणीही वाईट नजरेने बघू शकत नाही,कारण घरातला करता जिवंत असतो.तो जरी काहीही करत नसला तरी तो त्या पदावर असतो आणी घरच्यांचे कर्म बघत असतो,सांभाळत असतो.कोणाचा मुलगा होणं टाळता येत नाही,पण बाप होणं टाळता येत.पण बाप कधीच बाप होण्याचं टाळत नाही.आईच्या असण्याला अथवा आईच्या होण्याला बापामुळे अर्थ असतो.
        कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते,कारण ती जवळ घेते,कवटाळते,कौतुक करते,पण गुपचूप जाऊन पेढांचा पुडा आणणारा बाप कुणाच्याच कसा लक्षात येत नाही? पहलीत कर्णीच (बाळअंतीच) खूप कौतुक होतं पण हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थपणे वावरणाऱ्या त्या बापाची दखल कोणीच घेत नाही.
        चटका बसला,ठेच लागली,फटका बसला तर ''आई ग'' हाच शब्द बाहेर पडतो,पण हायवेला रस्ता क्रॉस करताना एखादा ट्रक जवळ येऊन अचानक ब्रेंक लावतो तेवाह मात्र ''बाप रे'' हेच शब्द बाहेर पडतात.कारण छोट्या संकटात आई चालते पण मोठ्या वादळांना पेलताना बापच आठवतो .......काय पटतय्ना?
         कोणत्याही मंगल प्रसंगी घरातील सर्व मंडळी जातात.पण मयताच्या प्रसंगी बापालाच जावा लागतं.कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जात नसतो.पण गरीब मुलीच्या घरी उभ्या-उभ्याने का होईना चक्कर मारतो.तरुण मुलगा उशीरा घरी येतो तेहवा त्याची आई नाही तर बापच जागा असतो.मुलाच्या नोकरीसाठी लाचार होणारा बाप,मुलीच्या स्थळासाठी उंबरठा झिजवणारा बाप.घरच्यांसाठी स्वतःच्या व्यथा दडपावणारा बाप....खरच किती ग्रेअत असतो ना?
         वडिलांचं महत्व कोणाला कळत?.......लहानपणीच वडील गेल्यावर अनेक जबाबदारया खूपच  लवकर  पेलाव्या लागतात,त्यांना एकेका वस्तूसाठी तरसावं लागतं.वडिलांना खऱ्या अर्थाने समजून घेते ती म्हणजे त्या घरातील मुलगी.सासरी गेलेल्या अथवा घरापासून दूर असलेल्या मुलीला बापाशी फोनवर बोलताना बापाचा बदलेला आवाज एका क्षणात कळतो.मग ती अनेक प्रश्न विचारते.कोणतीही मुलगी स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून बाप म्हणेल तेहवा विवाहाच्या बोहल्यावर चढते.मुलगी बापाला जाणते,जपते.इतरान्हीही आपल्याला जाणावं हीच बापाची किमान अपेक्षा असते.

वर्तमानपत्र वाचून तुमच मन कधी सुन्न झालंय का ? नाही ना...कसे होणार..


वर्तमानपत्र वाचून तुमच मन कधी सुन्न झालंय का ? नाही ना...कसे होणार..

रोजच खून, दरोडा, अपहरण, बलात्कार, भ्रष्टाचार, राजकारण, धमक्या, निषेध यांची इतकी सवय झाली आहे कि ते आता अंगवळणी पडलंय. आपली विवेकबुद्धी जागृत आहे पण भावनांना गंज चढलाय. प्रसार माध्यमांचे काम फक्त जाहिराती देणे, शहानिशा न करिता अफवा पसरविणे, बातम्या रंगवून आगीत तेल ओतणे इथपर्यंतच मर्यादित राहिले आहे.

टिळकांनी ज्यावेळी समाजप्रबोधन व सामाजिक जागृतीसाठी केसरी नियतकालिक सुरु केले होते, तेव्हा त्यांनी ठरविलेली ध्येय व उद्दिष्टे यांना आजच्या माध्यमांनी पूर्णपणे तिलांजली दिली आहे. वर्तमानपत्र हे चांगल्या विचारांचे व बालमनावर संस्कार करणारे प्रभावी साधन म्हणून पाहण्याचे दिवस आता गेलेत. बलात्कार किंवा अत्याचारांच्या घटना इतक्या रंगवून सांगितल्या जातात कि, अशा लोकांना जिवंतपणीच नरकयातना सहन कराव्या लागतात. देशात ज्यावेळी जातीय दंगले किंवा जमावाकडून हिंसक कृत्य होतात त्यावेळी माध्यमांकडून अतिशय भडक वर्णन करून याला खतपाणीच दिले जाते. मग दंगल/दुशकृत्ये करणाऱ्या इतकच त्यांना खतपाणी घालणारी प्रसारमाध्यमेही जबाबदार नाहीत का ?

कायद्याने माध्यमांवर सरकारचे नियंत्रण आहे. पण सरकार कुणाचे नि मध्यम कुणाचे. संगमताने एकमेकांच्या डोक्यावरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. काही दिवसांपूर्वीचे एक उदाहरण देतो. नारायण राणेंनी राष्ट्रवादीचे वस्त्रहरण करण्याची बातमी पुढारीमध्ये मुख्य बातमी होती तर सकाळमध्ये एका कोपऱ्यात होती तर आनंद परांजपेच्या राष्ट्रवादी प्रवेशाची बातमी सकाळमध्ये मुख्य बातमी होती तर पुढारीमध्ये कोपऱ्यात होती. थोडक्यात काय, प्रत्येक वर्तमानपत्राने एका मोठ्या राजकीय पक्षाला हाताशी धरले आहे. जणू कुत्र्याला मांजर साक्षी.

सामान्य जनतेचे प्रश्न मांडणे, सरकारच्या धोरणातील चुका दाखवून देणे, लोकांसमोर नीतिमत्तेचा आदर्श उभा करणे अशी विधायक कार्य सर्वजन विसरूनच गेली आहेत. या देशात सामान्य माणसाचा आवाज दाबला जाऊ शकतो परंतु माध्यमांचा नाही. अशावेळी माध्यमांकडून अतिशय जबाबदारीने  परिस्थिती  हाताळण्याची आवश्यकता असताना त्यांनीच असे बेजाबदार वर्तन केले तर सामान्य जनतेने कोणाकडे आशेने बघायचे ?

मध्यंतरी सुरेश कलमाडी तिहारमधून सुटलेली बातमी किंवा  ए. के. राजाना जमीन मिळाल्याची बातमी सर्वच माध्यमांनी Breaking News म्हणून प्रसिध्द केली परंतु त्याचवेळी विदर्भातील शेतकरी मरत असताना त्याची कोणी साधी दखलही  घेतली नाही यापेक्षा जास्त विरोधाभास कोणता ? काही दिवसापूर्वी एका जेष्ठ पत्रकाराने खंत व्यक्त केली कि, आज कालच्या पिढीला वाचनाची आवड नाही.  अतिशय खालच्या दर्जाचे लिखाण रोज माथी वाचल्यावर कोण आवडीने वाचेल ?

पत्रकारांनी जर स्वताच्या चौकटीत राहून योग्य लिखाण केले तर त्यांच्यावर होणारे हल्ले रोखण्यासाठी कायद्याची आवश्यकता भासणार नाही. देशातील जनतेला कोणता संदेश द्यायचा व तरुण पिढीवर काय बिंबवायचे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. नाहीतर जनतेकडे पर्याय आहेच, कचऱ्याच्या डब्यात तुमची जागा दाखविण्याचा.

शोध प्रेमाचा

 १४ फेब , अगदी लहान थोरांपर्यंत सगळ्यांना ही तारीख फक्त valentine डे म्हणून परिचित आहे  .
प्रेम काय असते . नक्की कशाला तुम्ही प्रेम म्हणता , नाही नाही मी इथे तुम्हाला त्याची व्याख्या सांगायला आलो नाही. हा फक्त माझ्या मनात असलेली  प्रेमाबद्दलची संकल्पना मांडण्याचा प्रयत्न करत आहे. नाही जमले ते तरी निदान त्याचे आजचे रूप मात्र तुम्हाला नक्कीच सांगीन.     
            आजचा तरुण वर्ग प्रेमाची ओळख त्यांनी भलतीच विचित्र तयार केली आहे. आजच्या या तरुण वर्गात प्रेमाला दिखावूपणाची  जोड देण्यात आली आहे. आजची पिढी प्रेम कशी करते माहितेय काही उदाहरणे देतो तुम्हाला .
१) एकाच  वर्गात शिकताना 
२) एकाच  ऑफिसमध्ये     
३) एकाच ठिकाणी राहत असलेली 
४ हल्लीच जन्माला आलेले इंटरनेट   
             आजची पिढी वरील एखाद्या माध्यमाशी जोडून असल्याने प्रेमात पडलेली आढळतील. आता मला सांगा दिवसातून खूप तास एखाद्या व्यक्ती सोबत राहिल्याने साहजिक त्याची सवय होते, त्याच्या हरेक गोष्टीची कल्पना येते, आवडी - निवडी कळतात. आणि आजच्या धावपळीच्या आयुष्यात चार हसरे क्षण घालवणारे कुणी असले की त्या व्यक्तीला आपण प्रेमात असल्याची अनुभती होते. म्हणजे बघा ना जी खर तर एक सवय असते त्याला ते प्रेम समजतो. 
           आता तुम्ही म्हणाल मग प्रेम म्हणायचे तरी कशाला. खर तर प्रेम ही एक कल्पना आहे जी विविध नात्यांमधून जन्माला येते. 
अर्थात हे कितपत योग्य आहे हे सांगणे कठीण आहे. पण माझ्या मते आई - मुल यांचे खरे प्रेमाचे नाते असते. 
स्त्री ही एका जीवाला जन्म देते जी एक नैसर्गिक किमया आहे, त्यात खरे प्रेम असते. हा पण जो वर त्या मुलाला वं मुलीला अक्कल येत नाही तोवर ते प्रेम. कारण त्यांना अक्कल आली की ते दुसरे प्रेम शोधत असतात, काय बरोबर ना हसू नका खरच बोलत आहे मी.
 पण आईचे तुम्ही एकच असता आणि शेवटपर्यंत. जावूद्या हा आईच्या प्रेमाचा मुद्दा खूप गहन आणि मोठा आहे , त्यावर पुन्हा केव्हा लिहीन. 
        महत्वाचे असे आहे की प्रेम म्हणजे नक्की काय जे आजच्या तरुण वर्गात प्रचलित आहे. मुलांना - मुलीना उमलत्या काळात भासणारी परी किव्वा राजकुमार हा स्वप्नापुरता असतो ज्याला कोणताच चेहरा नसतो, आपण तो चेहराच जनमानसात शोधत असतो. जेव्हा तसे कुणी मिळते तेव्हा त्या स्वप्नातल्या व्यक्तीला चेहरा मिळतो नाही का, पण तेही प्रेम आहे का  
      बरेच जन असे बोलतात की आयुष्यात प्रेम एकदाच होते मुळात मला हे पटत नाही. कारण भावना तीच असते ती कोणा एका चेहेरयाशी निगडीत का असावी. प्रेमाला कोणते रंग रूप लागत नाही, किव्वा सवयीला पण प्रेम म्हणते येत नाही. मग आता मला सांगा प्रेम म्हणजे काय 
तुम्ही बोलाल एखाद्यावर जीव लावून प्रेम करणे, एकमेकांत एकरूप होणे याला प्रेम म्हणतात , खरच असे काही असते का. किती प्रेमीवीर जोडप्यांचे  लग्न होते मला सांगा, आणि किती त्यात पूर्णपणे सुखी असतात, नाही नाही तुम्ही पुन्हा चुकतंय इथे मी अरेंगे मेरेज किव्वा लव मेरेग तफावत सांगत नाहीये, दोन्ही गोष्टीत नफे तोटे आहेतच की. मुळात एकनिष्ठ असे कोण असते प्रेमात आजच्या जगात सांगा ना .       
             प्रेमात असलेल्या खूप मुलांना मी विचारले ते म्हणतात अरे GF म्हणजे नुसता त्रास आहे यार , बर झाले तू प्रेमात नाहीस ,  म्हणजे याला काय म्हणायचे मग, मुळात प्रेम ही कल्पना सगळ्यांना झेपते का , की उगाच सगळे करतात म्हणून मी पण केले असे आहे ते. 
        बघा मी कुणाच्या विरुध्द बोलत नाही किव्वा कुणाला दुखावण्याचा अजिबात हेतू नाही, पण जे प्रश्न पडले त्या बद्दल तुम्हाला सांगावे म्हणून हा सगळा खटाटोप. बाकी तुम्ही सगळे सुज्ञ आहात. 
   

७ च्या आत घरात...


तसा हा जुनाट, अडगळीत गेलेला विचार. पण कालच एक अशी घटना आठवली कि मनात परत विचारचक्र चालू झाले. दोन महिन्यापूर्वी एका कॅ!ल सेंटरवरून रात्री ११ वाजता काम संपल्यानंतर घरी जाणाऱ्या युवतीवर तिच्याच सहकाऱ्यांनी पळवून नेऊन बलात्कार केला होता. त्यावेळी स्त्री सुरक्षेचा मुद्दा परत जोरदार चर्चिला गेला आणि थोड्या दिवसानंतर नेहमीसारखे कोणतीही कृती न होता ते वादळ परत शांत झाले.

सत्ययुगात रावणासारख्या राक्षसांपासून सीतेचे रक्षण करण्याकरिता आखलेली रेषा लक्ष्मण रेषा म्हणून ओळखली जाते. भारतीय संस्कृतीत, पालकांनी व कुटुंबीयांनी समाजातील महिलांचे पुरुष नावाच्या निशाचर श्वापदापासून  रक्षण करण्याकरिता आखलेली रेषा म्हणजे ७ च्या आत घरात. नवीन पिढीने आधुनिकतेच्या नावाखाली बऱ्याच जुन्या विचारांना व चालीरीताना छेद देऊन स्वताचे असे नियम आखले आहेत. यातील काही बदल त्यांना विनाशाकडे घेऊन जात आहेत. मुलीना रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते यासाठी अडगळीत फेकलेली संकल्पना म्हणजे ७ च्या आत घरात....

स्त्री शिकली, कर्तुत्ववान झाली, स्त्री-पुरुष समानता आली, समाजही बदलला पण समाजाची मानसिकता खरोखरच बदलली का ? स्त्री आजही स्व-संरक्षण करू शकते का ? ती सुरक्षित आहे का ? तिला सर्वांकडून मनापासून सन्मानाची वागणूक मिळते का ? आधुनिक बदलांसाठी ती सुसज्ज आहे का ? दुर्दैवाने यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे नाही अशीच आहेत. 

आरक्षण आले, समानता आली, सर्व क्षेत्रात स्त्रियांनी आपला ठसा उमटविला असे काहीही असले तरी दिवसेंदिवस स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारात वाढच होत आहे. कामाच्या ठिकाणी होणारी कुचंबना, कुचेष्टा, गर्दीचा फायदा घेऊन होणारे स्पर्श हे सर्व स्पष्ट करतात कि भारतीय समाज आजही स्त्रियांकडे फक्त "चूल नि मुल " व "भोगाची वस्तू " याच दृष्टीकोनातून बघतो आहे. भीती, लाज, संकोच, बदनामी यामुळे स्त्रिया तक्रार करत नाहीत याचाच गैरफायदा अनेकजण घेतात.

संसाराचा गाडा चालविण्यासाठी   काम तर करावे लागणार व अशा गोष्टी घरी सांगितल्या तर त्यावरही गदा येणार अशा दुहेरी कात्रीत भारतीय स्त्री सापडली आहे. स्त्रियांच्या असहायतेपनाची, दडपणाची, भीतीची मजा घेण्याची विकृती वाढत आहे. रस्त्यावरून जाताना, प्रवासात छेडछाड करण्याचे प्रमाण वाढले आहे. कामाच्या ठिकाणी होणारे अन्याय, खालच्या पातळीवर जाऊन केलेली टीका, प्रवासातील त्रास हे सर्व मनावर दगड ठेऊन सहन करण्याशिवाय तिच्यावर पर्यायच नाही. पण अजून किती दिवस हे सहन करायचे ??

स्त्रीला तीच स्त्रीत्व जपता आलाच पाहिजे. याकरिता त्यांनी स्वताची हिम्मत वाढवावी. जिथल्या तिथे जाब विचारल्याशिवाय अशा अपप्रवृत्ती थांबणार नाही. स्त्री सक्षम होण्यासाठी पालकांनीही संवेदनशील होण्याची गरज आहे. मुलीनी आपल्या मित्र-मैत्रीणीविषयी, ऑफिसमधील सहकाऱ्यांविषयी घरी माहिती द्यावी. आपल्या अडचणी, होणारे खर्च याविषयी मोकळेपणाने बोला. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे घरी वेळेवर या.

प्रगतीसाठी पूर्ण स्वातंत्र्य हवे पण यातील काही मार्ग विनाशाकडे घेऊन जाणारे नकोत. जाचक  अटी, स्वातंत्र्यावर घाला अशा गोष्टी मनातून काढून टाकायला हव्यात. उलट सभ्य रावनांपासून सुरक्षित राहण्यासाठी हे सर्व काटेकोरपणे अमलात आणले पाहिजे. शेवटी, तंत्रज्ञान किठी प्रगत झाले तरी तडा गेलेय काचेला ते पूर्वीचे वैभव प्राप्त करून देऊ शकत नाही. 

Monday, 27 February 2012

माणूस..


माणूस.....

कसं विचित्र द्वंद्व चालू असते....
...आपल्या आतच ....

एकीकडे स्वतःला विज्ञानवादी म्हणवतो
पण गाडीची डिलिव्हरी "अमावस्येला" नको म्हणतो

का शनिवारी काही देवळांसमोर लांब रांगा लागलेल्या
एका हाती ब्लॅकबेरी, दुसर्‍या हाती तेल घेतलेल्या

कुठून आलो या जगात ठाव काही लागत नाही
कुठे जाणार शेवटी ते ही ठाऊक नाही

कुणी म्हणो विज्ञानवादी कुणी म्हणो दैववादी
माणूस अखेर माणूसच .....
कळसूत्री बाहुल्यासारखा .....

दृश्य - अदृश्याच्या दोर्‍यांवर ....सदैवच लोंबकळणारा !!!!